कल्याण: केडीएमसीने 490 पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू केली असून त्याची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये कोणती पदे आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. कोणाला काही शंका असल्यास त्यांच्या शंका निरासनाकरिता महापालिकेने एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त गोयल यांनी सांगितले, भरतीप्रक्रिया पारदर्शी आणि ऑनलाईन आहे. कोणीही महापालिकेच्या नावाचा वापर करून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्यास त्याची तक्रार त्वरीत महापालिकेस करावी अथवा ही बाब महापालिकेच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहान ही त्यांनी केले.
चौकट- केडीएमसीच्या शाळा येत्या 16 जून पासून सुरू होणार आहे. महापालिकेच्या 58 पैकी 5 शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यम पहिलीच्या वर्गापासून सुरू केले जाणार आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांना नवे फर्निचर पुरविण्यात आले आहे. शाळांच्या इमारतींना रंगरंगोटी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन जोडी गणवेश, एक पीटीचा गणवेश, वह्या पुस्तके दिली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दप्तरे, बूट, रेनकोट हे साहित्य डीबीटी मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. विद्यार्थ्याना गुणवत्ता पूर्वक शिक्षण देण्यासाठी विनोबा भावे अप उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा लर्निग पॅटर्न विद्यार्थ्यांनी कितपत आत्मसात केला आहे. त्याचा आढवा दर दोन तीन महिन्यांनी घेतला जाणार आहे. अंतिम टप्प्यात त्यांची उजळणी केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार आहे.
एनडीआरएफची एक तुकडी दाखल
पावसाळ्य़ात आपतकालीन व्यवस्थाकरिता महापालिका मुख्यालयात आपतकालीन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात प्रत्येकी एक आपतकालीन क क्ष कार्यान्वीत केला आहे. आपतकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेस सरकारने एनडीआरएफची एक टीम उपलब्ध करून दिली आहे. ही टीम आपतकालीन परिस्थितीत महापालिका हद्दीत मदत आणि बचाव कार्य करणार आहे अशी माहिती गोयल यांनी दिली.