ब्रेकिंग न्यूज! २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे Air Indiaचे विमान अहमदाबादमध्ये कोसळले!

12 Jun 2025 14:15:30


Air India Plane crashes in Ahemdabad
 
गांधीनगर : (Air India Plane crashes in Ahemdabad) अहमदाबाद विमानतळाजवळ एक मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानी नगर परिसरात कोसळले. दरम्यान, यात गुजरातचे माजी मुख्यमंत्रीही विजय रुपाणी प्रवास करत होते. 
 
गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले ते निवासी क्षेत्र असल्याची माहिती आहे. त्या भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप जीवितहानीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
तसेच या विमानात २ वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
 

बातमी अपडेट होत आहे...
 
Powered By Sangraha 9.0