प्रियंका गांधीची खासदारकी अडचणीत! केरळ उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

11 Jun 2025 14:24:20

कोची(Priyanka Gandhi): वायनाड लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नव्या हरिदास यांनी केला आणि त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात केली आहे.

नव्या हरिदास यांनी भाजपच्या तिकिटीवर वायनाड मतदार संघातून प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांचा गांधीकडून ५,१२,३९९ मंतानी पराभान झाला होता. त्यानंतर काही तथ्यांच्या आधारावर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

या याचिकेला उत्तर देत केरळ उच्च न्यायालयाने प्रियांका गांधी वाड्रा यांना समन्स पाठवले आहेत. नव्या हरिदास यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,नोव्हेंबर २०२४ मध्ये वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी त्यांनी निवडणूक लढवताना स्वतःच्या आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अनेक मालमत्ता आणि गुंतवणुकीची माहिती लपवली आहे. या याचिकेवर पुढील कारवाही ऑगस्टमध्ये होईल, असे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले.



Powered By Sangraha 9.0