ऋषीमुनींचे त्याग व तपश्चर्या समोर ठेऊन संघकार्याचा प्रारंभ : जे नंदकुमार

11 Jun 2025 15:22:54

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (J Nandakumar on RSS 100)
समाजासमोर आदर्श मांडण्यासाठी संघाची स्थापना झाली होती. ऋषीमुनींचे त्याग व तपश्चर्या समोर ठेऊन संघकार्याचा प्रारंभ झाला, असे मत प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम (सामान्य)चा समापन समारोह दीनदयाळ उपाध्याय सनातन धर्म विद्यालयात, कानपूर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उमाशंकर पांडे, कानपूर विभागाचे विभाग संघचालक डॉ. श्याम बाबू, वर्ग कार्यवाह भुवनेश्वर वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.


उपस्थितांना संबोधत जे. नंदकुमार पुढे म्हणाले, समाजासमोर आपला आदर्श प्रस्तुत करण्याच्या उद्देशाने संघाची स्थापना झाली होती. संघ शाखेत दररोज राष्ट्राचा विचार केला जातो. संघ गेल्या १०० वर्षांपासून हेच कार्य करत आहे. आज आपण जगाला दिशा देण्याच्या स्थितीत आहोत. यामागे संघ शाखा आणि संघ स्वयंसेवकांचे अमूल्य योगदान आहे. भारत हिंदू राष्ट्र होता, हिंदू राष्ट्र आहे आणि कायम हिंदू राष्ट्रच राहील. या भावनेने प्रेरित होऊन हजारो स्वयंसेवक आज काम करत आहेत.


Powered By Sangraha 9.0