केंद्रीय मंत्रिमंडळाची दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

11 Jun 2025 18:19:23
Union Cabinet approves two railway projects

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांचा एकूण अंदाजे खर्च ६ हजार ४०५ कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे १०८ लाख मनुष्य दिवसांचा थेट रोजगार निर्माण होणार आहे.

यापैकी, कोडरमा-बरकाकाना डबलिंग (१३३ किमी) प्रकल्प हा झारखंडमधील प्रमुख कोळसा उत्पादक क्षेत्रातून जातो. याव्यतिरिक्त, हा पाटणा आणि रांची दरम्यानचा सर्वात लहान आणि अधिक कार्यक्षम रेल्वे मार्ग आहे. त्याचप्रमाणे बेल्लारी-चिकजाजूर डबलिंग (१८५ किमी) हा प्रकल्प मार्ग कर्नाटकातील बेल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जातो.

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३१८ किमीची भर पडेल. मंजूर झालेल्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे २८.१९ लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे १,४०८ गावांना दळणवळण मिळेल. कोळसा, लोहखनिज, रिफाइंड स्टील, सिमेंट, खते, कृषी वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादने इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वाढीमुळे ४९ एमटीपीए अतिरिक्त मालवाहतूक होईल.
Powered By Sangraha 9.0