टीएमसी खासदार साकेत गोखलेंनी मागितली माजी राजदूत लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी! नेमकं काय म्हणाले?

10 Jun 2025 14:04:29

tmc mp saket gokhale issues unconditional apology to ex-diplomat lakshmi puri
 
नवी दिल्ली : (TMC MP Saket Gokhale apologised to Ex-Diplomat Lakshmi Puri) तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मानहानीच्या प्रकरणात माजी भारतीय राजदूत आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांची बिनशर्त माफी मागितली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने साकेत गोखले यांना एका आठवड्याच्या आत लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी मागण्याचे आणि ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
 
हे वाचलंत का?-  लक्षद्वीपच्या शालेय अभ्यासक्रमातून अरबी आणि महाल भाषा हटवण्याच्या निर्णयावर केरळ उच्च न्यायालयाची स्थगिती
 
खासदार साकेत गोखले यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "१३ आणि २३ जून २०२१ रोजी राज्यपाल लक्ष्मी मुरडेश्वर पुरी यांच्याविरुद्ध केलेल्या ट्विट्सबद्दल मी बिनशर्त माफी मागतो, ज्यामध्ये लक्ष्मी पुरी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आणि पुराव्यांशिवाय परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचे आरोप केले होते, ज्याबद्दल मला मनापासून खेद वाटत आहे." हे प्रकरण जून २०२१चे आहे, जेव्हा गोखले यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांच्यावर परदेशात बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला होता. लक्ष्मी पुरी यांनी हे आरोप खोटे ठरवत मानहानीचा खटला दाखल केला.
  
न्यायालयाने असे आढळून आले की खासदार गोखले यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि पुराव्यांशिवाय सोशल मीडियावर एखाद्याची प्रतिमा मलीन करणे चुकीचे आहे. न्यायालयाने आदेश दिला आहे की, खासदार साकेत गोखले यांनी केलेल्या विधानावर माफी मागणं हे आवश्यक आहे. पण केवळ एक्स वर माफी मागणं पुरेसं नाही. त्यांनी आपल्या प्रोफाइलवर ६ महिन्यांसाठी ते पिन करून, हे राष्ट्रीय स्तरावर लोकांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून त्यांना याची जाणीव होईल की, त्यांनी चुकीचं विधान दिलं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0