
यामध्ये ६ हजार २५० रूपयांची वाढ करून त्यांना दरमहा ८ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तर याच अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना महागाई भत्त्यासह १० हजार रूपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. या वाढीनंतर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३ हजार ७३० रूपये इतके विद्यावेतन मिळणार. ही वाढ १ जून, २०२५ पासून मिळणार.
: बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता विद्यावेतन मिळणार आहे. मंगळवार, दि. १० जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी), व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण काळात दरमहा १ हजार ७५० रुपये विद्यावेतन मिळत होते.मुंबईकिती पैसे मिळणार?मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड या पाच ठिकाणी शासकीय परिचर्या महाविद्यालयात बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रम सुरू आहे. या प्रत्येकी ठिकाणी ५० विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांचा आंतरवासिता कालावधी सहा महिन्यांचा असतो. या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार रूपये विद्यावेतन देण्यास मान्यता देण्यात आली.