
ग्राझ: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नापासून सुमारे २०० किमी अंतरावर आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या ग्राझमध्ये मंगळवारी,दि. १० जून रोजी एक भयानक गोळीबार झाला आहे. बोर्ग ड्रायर्सचुत्झेंगासे शाळेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
मीडिया अहवालानुसार, भारतीय वेळेच्या दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. या घटनेत गोळीबार करणाऱ्यासह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना आपत्कालीन उपचारांसाठी जवळच्या हेल्मुट लिस्ट हॉलमध्ये नेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे, गोळीबार करणारा शाळेचाच विद्यार्थी होता, अशी माहिती ऑस्ट्रियाच्या एपीए वृत्तसंस्थेव्दारे येत आहे.
स्थानिक पोलिसांनी सांगितले स्थानिक पोलिसांनी सांगितले की सध्या बचाव कार्य सुरू आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित झाल्यामुळे काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढे कोणताही धोका नाही, अशी शाश्वती पोलिसांनी तेथील स्थानिक नागरिकांना दिली.