विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

10 Jun 2025 16:15:39

Yogi Adityanath Unveiling of Suheldev Memorial

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Unveiling of Suheldev Memorial)
विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुहेलदेव स्मारकाचे अनावरणही केले.

हे वाचलंत का? : फरार वजाहत खानच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

उपस्थितांना संबोधत योजी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ज्या लोकांनी धर्म आणि जमीन वाचवण्यासाठी काम केले होते, त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने काय केले? महाराज सुहेलदेव यांच्या नावाने हे स्मारक आधी का बांधता आले नाही? कारण मतपेढीची चिंता होती, पण तुष्टीकरणाचे धोरण अपयशी ठरू नये म्हणून ते महापुरुषांची नावे कुठेतरी ठेवत असत आणि मुस्लिम मतपेढीमुळे ते परकीय आक्रमकांविरुद्ध एकही शब्द बोलत नव्हते.

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी महाराजा सुहेलदेव यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, प्राचीन काळी आक्रमक सालार गाझीने देश काबीज करण्याच्या उद्देशाने बहराइचकडे कूच केले होते. त्यानंतर राजभर महाराजा सुहेलदेव यांनी आजूबाजूच्या राजांसह युद्ध केले आणि मलिहाबादमधील चित्तौरा तलावाच्या काठावर सालार गाजीचा पराभव केला.

Powered By Sangraha 9.0