फरार वजाहत खानच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या!
10 Jun 2025 15:22:59
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Accused Wajahat Khan Arrested) गुरुग्राममधील कायद्याची विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला इस्लामविरोधी टिपण्णी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दि. ५ जून रोजी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. याचदरम्यान तक्रारदार वजाहत खान स्वतः फरार झाल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले होते. मात्र वजाहतच्या कोलकाता पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत.
तक्रारदार वजाहत खान दि. १ जूनपासून फरार होता. त्याने आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून हिंदू समुदायाला लक्ष्य करणारे द्वेषपूर्ण भाषण पोस्ट केले होते, ज्यामध्ये हिंदू सण, देवता आणि मंदिरांवर अपमानास्पद टिप्पणी होती. त्यासोबतच त्याने शर्मिष्ठाच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्टही लिहिल्या होत्या. पोलिसांनी त्याला तीनदा नोटीस पाठवली पण तो हजर झाला नाही. त्याच्या शोधात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. अखेर पश्चिम बंगालच्या अमहर्स्ट स्ट्रीट परिसरातून अटक करण्यात आली. वजाहत खान विरुद्ध एकूण २७ एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे.