"बच्चन साहेबांना असं काय झालं?", सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण - वाचा सविस्तर

09 May 2025 16:04:02
 





what happend to mr Amitabh Bachhan, his post on social media sparks questions


मुंबई
: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. विशेषतः एक्स या प्लॅटफॉर्मवर ते दररोज रात्री आपली दिवसाची सांगता खास "T-" या क्रमांकासह ट्विट करतात. त्यांच्या या खास ट्विटसचा एक वेगळा फॅनबेस आहे. पण अमिताभ बच्चन गेल्या २० दिवसांपासून दररोज एक ट्विट करत आहेत, पण हे ट्विट पूर्णपणे रिकामं असतं – फक्त "T-" असा क्रमांक असतो आणि त्याशिवाय काहीही नाही.





हे पाहून चाहते संभ्रमित झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत विचारलंय, "नेमकं झालय तरी काय”? या रहस्यमय ट्विट्सवर रेडेट वरही चर्चा होत आहे. काहींजण म्हणत आहेत की ते एखाद्या बॉट, ऑटोमेटेड टूलचा वापर करून बघत असावेत, ज्यामुळे त्यांना रोजचे ट्विट्स पोस्ट करण्यात मदत होईल. तर काहीजणांचे म्हणणे आहे की, ते ५० दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत. अमिताभ बच्चन यांचं सध्या ट्विटरवर ४९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यांनी याआधी ट्विटर फॉलोअर्स न वाढण्याबावत ट्विट केले होते. मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी काय करू? काही उपाय असल्यास सांगा असा प्रश्न विचारला होता.
Powered By Sangraha 9.0