भावनिक फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं : पृथ्वीराज चव्हाण

09 May 2025 17:18:29
 
prithviraj chavan criticized operation sindoor bjp leaders reaction
 
मुंबई : (Prithviraj Chavan criticized Operation Sindoor) 'सिंदूर' या अनेक शब्दाशी भावना जोडल्या गेल्या आहेत. परंतु भावनांनी युद्ध जिंकता येत नाही. ते शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्यांनी जिंकले जाते. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव सरकारने भावनिक फायदे मिळवण्यासाठी निवडले होते; परंतु याचा काहीही फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधी केलेल्या लष्करी कारवाईबद्दल सैन्याचे अभिनंदन केले. परंतु 'ऑपरेशन सिंदूर' नाव निवडले असले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. मतपेढीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात असल्याचे ते म्हणाले. त्यांचे हेच वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला असून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी सध्या यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे म्हटलंय. तसेच या घडीला सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिबा आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? - जग आपल्यावर हसतयं! आपण युद्ध साजरं करतोय : संजय राऊत
 
चव्हाणांचे विधान लज्जास्पद : भाजप
 
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन ए. सिन्हा यांनी पलटवार करत पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटले. यावेळी ते म्हणाले की, "त्यांनी म्हटलं की 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव भावनिक फायदा मिळवण्यासाठी देण्यात आले होते. पण मला वाटते की ते खूप लज्जास्पद विधान आहे. 'ऑपरेशन सिंदूर' चा अर्थ केवळ असा आहे की वर्षानुवर्षे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आपल्या माता-भगिनींचे सिंदूर पुसत आहेत आणि आता, कालच्या हल्ल्यानंतर कोणताही दहशतवादी पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाही. असं काही करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील." तर आमदार राम कदम यांनी संवेदनशील बाबींना स्वस्त राजकारणाशी जोडण्याची काँग्रेस नेत्यांची जुनीच सवय असल्याची टीका केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0