भारत – पाक युद्धाशी आमचा संबंध नाही – अमेरिकीचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची भूमिका

09 May 2025 17:46:00

US Vice President JD Vance on india pakistan war
 
नवी दिल्ली: ( US Vice President JD Vance on india pakistan war ) अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी गुरुवारी सांगितले की भारत आणि पाकिस्तानने तणाव कमी करावा. त्याचवेळी त्यांनी असेही म्हटले की अमेरिका अण्वस्त्रधारी आशियाई शेजारी देशांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्यांच्यातील युद्धाशी "आमचा काहीही संबंध नाही”, असे अतिशय स्पष्ट शब्दात व्हान्स यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकचेस कंबरडे मोडण्यास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे यास अमेरिकेसह जागतिक समुदायाकडून भारतास पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स फॉक्स न्यूजशी गुरुवारी बोलताना म्हणाले, हा संघर्ष लवकरात लवकर सुटावा असे अमेरिकेचे मत आहे. मात्र, आम्ही दोन्ही देशांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
 
व्हान्स पुढे म्हणाले, अमेरिका दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी केवळ प्रोत्साहित करू शकतो. मात्र, अमेरिका अशा युद्धात अडकणार नाही. कारण, मुळात ते आमचे काम नाही आणि अमेरिकेच्या त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेशी त्याचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0