परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

09 May 2025 18:51:54

Transport Minister Pratap Sarnaik and Minister Ashish Shelar will inaugurate dthe Passenger room Control Room at Nancy Depot today.


मुंबई - भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

या उदघाटन सोहळ्याला उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे, चारकोप विधानसभा क्षेत्राचे आ. योगेश सागर, कांदिवली क्षेत्राचे आ. अतुल भातखळकर, दहिसर विधानसभा क्षेत्राच्या आ. मनीषा चौधरी, विधान परिषदेचे माजी आ. भाई गिरकर, बोरिवली विधानसभा क्षेत्राचे माजी आ. सुनील राणे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे मंडळ अध्यक्ष (उत्तर) अमित उतेकर, मागाठाणे मंडळ अध्यक्षा (मध्य) सोनाली नखुरे, मागाठाणे मंडळ अध्यक्ष (दक्षिण) अविनाश राय यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0