कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची बैठक संपन्न

    09-May-2025
Total Views |
 
Self-Redevelopment meeting at Konkan Divisional Commissioner Office
 
मुंबई : ( Self-Redevelopment meeting at Konkan Divisional Commissioner Office ) राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे. या अभ्यासगटाची दुसरी बैठक गुरुवारी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
 
या बैठकीत अभ्यास गटाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्यासह वसई (पालघर) च्या आमदार स्नेहा दुबे, नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, आयएएस अधिकारी, कोकण विभागातील महानगरपालिका (ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर), अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषद, तसेच सिडको, म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
 
या बैठकीत शासनाच्या २०१९ शासन निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत आढावा झाला. अधिकाऱ्यांच्या सूचना घेण्यात आल्या तसेच येणाऱ्या अडचणींवरती चर्चा झाली. नवी मुंबईतील महापालिका व सिडको मधील समन्वयाची गरज, ओसी अगर सीसी नसलेल्या इमारतींचे स्वयंपूर्ण विकासातील, मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपूर्ण विकास आणि ज्या सवलतींवर अंमलबजावणी झाली नाही त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत दरेकर यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले.
 
नवीमुंबईमधील तीन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी त्यांच्या स्वयंपुनर्विकासातील अडचणी सांगितल्या. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मुख्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते. ठाणेकरांनी मुंबई बँकेचे अनुकरण करून त्याच प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने काम करावे असेही दरेकरांनी सांगितले.