भारताकडून पाकिस्तानी हवाई दलाला मोठा झटका

09 May 2025 18:18:43

Pakistan air force terrified by India

इस्लामाबाद : ८ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पठाणकोट, उधमपूर इ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या AWACS विमानासह त्यांच्या तीन लढाऊ विमानांना पाडले. या कारवाईत भारताने पाकिस्तानची लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निकामी केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

माहिती नुसार निकामी करण्यात आलेल्या विमानांमध्ये AWACS विमानासह, ३ लढाऊ, २ चीनी jf-17 आणि १ अमेरिकन F-16 विमान सहभीगी होते. पाकिस्तानी हवाई दलाने ह्या नंतर पंजाब,राजस्थान आणि जम्मू-काश्मीर च्या सिमांवरती ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडली. भारतीय सैन्य दलानी ती शितफीने निकामी केली.

पाकिस्तानच्या AWACS विमानांना निकामी झाल्यामुळे त्यांच्या हवाईदलची अवस्था बिकट झाली आहे. ही विमान शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, इतर विमांनाबरोबर माहितीची देवाणघेवाण करून परतवार करण्यासाठी वापरण्यात येतात. विमानांच्या एअरफ्रेमच्या वर एक मोठी रडार डिश बसवलेली आहे ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण अतीशय सोपे होते. विमानांच्या नाशामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचेच नाही तर अर्थव्यवस्थेवर देखील ताण पडणार आहे.

या घटनेनंतर भारत व पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. पाकिस्तान भारतावर आरोप करते आहे, भारताने त्यांच्या नागरिकांवर हल्ला केला, पण भारताने आम्ही फक्त पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर दिले असे ७ मे २०२५ च्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.

Powered By Sangraha 9.0