मुंबई: ( Opretion Sindoor LIVE updates ) भारत-पाक संघर्षात घाटकोपरचे सुपूत्र मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले. पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना शुक्रवार, दि. ९ मे रोजी पहाटे ३ वाजता भारतीय लष्कराच्या या जवानाला वीरगती प्राप्त झाली.
मुरली यांचे वडील श्रीराम नाईक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे घाटकोपर पश्चिम येथील कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ही झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली.
त्यामुळे सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेश येथील मूळ गावी राहण्यास गेले आहे, अशी माहिती भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिली. तसेच भारतमातेच्या या शूर सुपुत्राला त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.