भारताने आमचे खूप नुकसान केले आहे, आम्हाला आता आणखी कर्ज हवंयं!

09 May 2025 12:39:24



India has made a lot of damage, Pakistan officials asking for more loan to others


कराची
: आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अशी पाकिस्तानची अवस्था होताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने जगभरातील देशांकडून आर्थिक मदत मागितली आहे. पाकिस्तानी सरकारचा आर्थिक व्यवहार विभागाने एक्स पोस्ट करत ही मागणी केली आहे. युद्धामुळे आमच्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे, आणि सरकारकडे पैसा कमी आहे. त्यामुळे आम्ही संयुक्त राष्ट्र , आणि इतर देशांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.


दरम्यान, दि. ९ मे रोजी पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळणार होते. मात्र, सध्याची परिस्थिती आणि पाकिस्तानने केलेल्या कुरापती पहाता तेही अशक्य आहे. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आपल्या मुसद्दी धोरणांद्वारे कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानला सध्या कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत ही भारताविरोधात युद्धासाठी मदत मानली जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला मिळणारे कर्जही मिळेनासे होणार आहे.


India has made a lot of damage, Pakistan officials asking for more loan to others


पाकिस्तानमध्ये अनेक भागांमध्ये वीज, पाणी आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये लोकांना अन्न आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. या सर्व गोष्टींसाठी पाकिस्तान सरकारला पैशाची गरज आहे. भारत सरकारने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानच्या या अवस्थेला ते स्वत: कारणीभूत आहेत अश्या प्रकारच्या प्रतिक्रीया भारतीय सोशल मिडियावर देण्यात येत आहेत. ८ मे च्या मध्यरात्री भारताने दिलेल्या प्रतिउत्तरानंतर पाकिस्तानची ही अवस्था झाली आहे.


Powered By Sangraha 9.0