नवी दिल्ली :(Film on Operation Sindoor) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवार, दि. ६ मे रोजी चालविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे संपूर्ण जगाने पाहिले. ‘सिंदूर’ या शब्दातच त्याग आणि शौर्याच्या पारंपारिक भारतीय संकल्पना दिसून येतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा वापर ट्रेडमार्कसाठी करण्याची परवानगी द्यावी, असे अर्ज ट्रेडमार्क कायदा, १९९९च्या अंतर्गत रिलायन्स सहित अन्य तीन जणांनी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे सादर केले आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ लष्करी कारवाईची घोषणा झाल्याच्या काही तासानंतर ट्रेडमार्क अर्ज दाखल करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही पहिली कंपनी होती. त्यानंतर पुढील २४ तासांत, आणखी तीन अर्जदार आले, जे की,मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक आणि मीडिया सेवांसाठी या नावाचा वापर करता यावा, यासाठी मागणी करत आहे.
या अर्ज करणाऱ्यापेंकी रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी, मुंबईचे रहिवासी मुकेश चेतराम अग्रवाल, निवृत्त भारतीय हवाई दल अधिकारी ग्रुप कॅप्टन कमल सिंग आणि दिल्लीस्थित वकील आलोक कोठारी आहेत. प्रत्येकांनी आपल्या अर्जात ‘ऑपरेशन सिंदूर’हे नाव ट्रेडमार्कसाठी व्यावसायिक हेतूंने वापरण्यास इच्छूक आहात’ असे अधोरेखित केले आहे.
'ऑपरेशन सिंदूर' हा शब्द भारतीय लष्कराने सीमापार केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देतो, ज्याने की भारतच नव्हे तर जगभर लक्ष वेधले आहे. ‘सिंदूर’ हा शब्द हिंदु धर्मातील महिलासाठी त्याग, समर्पण, धर्म आणि शौर्य यांचे प्रतिक आहे. या शब्दाच्या पावित्र्यामुळे ,शक्तिशालीपणामुळे, भावनिकतेमुळे आणि देशभक्तीमुळे तो चित्रपट, माध्यमे आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात वापरण्यासाठी एक लोकप्रिय शब्द बनेल, त्यामुळे व्यावसायिक ट्रेडमार्क नोंदणीसाठी इच्छुकांचा आपआपला दावा सांगितला जातो.
या सर्वानी ट्रेडमार्क वर्ग ४१ अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आहे. जे की, युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) द्वारे ट्रेडमार्कचे वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४५ वस्तू आणि सेवांपैकी एक आहे. वर्ग ४१ अंतर्गत शिक्षण, प्रशिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम यासारख्या शिक्षण आणि मनोरंजन सेवांचा समावेश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा नजकीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रोडक्शन हाऊस, ब्रॉडकास्टर आणि इव्हेंट कंपन्यांद्वारे वापरला जाऊ शकते. हा शब्द लवकरच चित्रपटाचे शीर्षक, वेब सिरीज किंवा डॉक्युमेंटरी ब्रँड बनू शकते.
ट्रेडमार्क कायदा, १९९९च्या कलम ९(२) आणि कलम ११ अंतर्गत, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा शब्द जर राष्ट्रीय संरक्षणाशी तुलना व्यापाराशी करत असेल किंवा खोटे संबंध दर्शवित असेल किंवा सार्वजनिक भावना दुखावत असेल तर रजिस्ट्रारला चिन्ह नाकरण्याचा अधिकार आहे. सध्यातर संबधित सर्व अर्ज ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिसकडे विचाराधीन आहेत.