पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पीओजेकेमध्ये आयएसआय आणि हमासची भेट झाली होती. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य हमास या दहशतवादी संघटनेसारखे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने देशभरातील सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व विमानतळांवरील सर्व प्रवाशांना Secondary Ladder Point Check (SLPC) करावी लागेल. टर्मिनल इमारतींमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार एअर मार्शल तैनात केले जातील: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सूत्र.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
गुरुवारी रात्री पाकिस्तानतर्फे जम्मू भागात हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, जो भारताने हाणून पाडला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रात्रीच देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) यांच्यासह भारताचे लष्कर, हवाईदल आणि नौदलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची डॉ. जयशंकर यांच्यासोबत चर्चा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. रुबियो यांनी तणाव त्वरित कमी करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील थेट चर्चेला अमेरिकेचा पाठिंबा व्यक्त केला आणि संवाद सुधारण्यासाठी सतत प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याबद्दल सचिवांनी शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.