पाकिस्तान पुन्हा हादरला! ऑपरेशन सिंदूरनंतर लाहोरमध्ये स्फोटांचे आवाज, नेमकं काय घडलं?

08 May 2025 12:20:51

a loud explosion was heard in pakistan
 
लाहोर : (Lahore Blast) भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाले असून पाकिस्तानी माध्यमांनी ड्रोन हल्ले झाल्याचा दावा केला आहे.
 
हे वाचलंत का? - Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती
 
नेमके कुठे स्फोट झाले?
पाकिस्तानच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, गुरुवारी ८ एप्रिलला सकाळी लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरील वॉल्टन विमानतळाजवळ एकामागून एक अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. वॉल्टन विमानतळाजवळ पाकिस्तानी लष्कराचे युनिट असलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला. त्यानंतर परिसरात सायरनचे आवाजही ऐकू आले. स्फोटाचे आवाज ऐकू येताच नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन पळापळ केल्याचे दिसून आले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट उठताना दिसले. स्फोटांनंतर लाहोर विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. कराची विमानतळावरील विमान वाहतूकही सध्या थांबवण्यात आली आहे. लाहोरमध्ये झालेल्या या स्फोटाचे कारण किंवा माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
पाकिस्तानच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. सध्या याची माहिती मिळालेली नाही की या हल्ल्यात जीवितहानी झाली आहे की नाही. सकाळच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याच्या आवाजाने संपूर्ण लाहोर हादरुन गेला आहे. तर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0