लाहोरमध्ये स्फोट ; पाकिस्तानची हवाई सेवा बंद

08 May 2025 12:55:41
 Pakistan Airspace closed because of bomb blasts at Lahore Pakistan

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर शहरातील वॉल्टन रोड आणि वॉल्टन विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाने स्फोटांचे कारण शोधण्याचा तपास सुरू केला आहे.
या स्फोटांची माहिती आली , जेव्हा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधला होता. ही कारवाई एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे प्रतिउत्तर म्हणून करण्यात आली होती, ज्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता.
माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. गोकुल नगर आणि नसीराबाद भागांमध्ये सायरन वाजवण्यात आले. तेव्हा लोकांनी घाबरून आपली घरे सोडली. हे भाग वॉल्टन विमानतळाच्या आसपास असून लाहोरच्या उच्चभ्रू व्यवसायिक भागाशी आणि लष्करी कॅन्टोन्मेंटशी लागून आहेत.
विमानतळ ४८ तासांकरता बंद..

भारताच्या मंगळवारी झालेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील सर्व व्यावसायिक विमानसेवांसाठी हवाई सेवा बंद केली आहे. वॉल्टन विमानतळ पुढील १२ ते २४ तासांकरीता संपूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तान एअरपोर्ट्स प्राधिकरणाने बुधवारी रात्री यासंदर्भात घोषणा केली. कराची विमानतळ मात्र कार्यरत आहे.
Powered By Sangraha 9.0