दहशतवादापुढे भारत झुकणार नाही हे पुन्हा एकदा मोदींनी दाखवून दिले - आमदार प्रवीण दरेकर

- दरेकरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सर्व सैनिकांचे अभिनंदन

    07-May-2025
Total Views |

pravin darekar on operation sindoor
 
मुंबई ( pravin darekar on operation sindoor ) दहशतवादापुढे भारत झुकणार नाही, घरात घुसून कठोर कारवाई करील, माता, भगिनीसमोर निशस्त्र आप्तांना गोळ्या घालणाऱ्यांचा बदला त्यांच्या भूमीत जाऊ घेतला जाईल, हे पुन्हा एकदा देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "ऑपरेशन सिंदूर" च्या माध्यमातून दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
दरेकर पुढे म्हणाले की, आता तरी पाकिस्तान त्यांच्या देशात दहशतवाद पोसणार नाही, अशी आशा करू. अन्यथा, यापेक्षाही वाईट परिस्थिती भारत पाकिस्तानची करेल, हाच संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे.
 
पहलगाम मधील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ले करून, ते नष्ट केल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचे अभिनंदन केले आहे. सर्व भारतीय आपल्या बरोबर असून आपल्या सर्वांचा भारतीयांना अभिमान आहे, असेही दरेकर म्हणाले.