Operation Sindoor : "...ही कारवाई होणारच होती"; 'ऑपरेशन सिंदूर'वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

यशस्वी कारवाईनंतर तिन्ही सैन्यदलांचं कौतुक

    07-May-2025   
Total Views |

PM Narendra Modi On Operation Sindoor
 
 
मुंबई : (Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
 
...ही कारवाई होणारच होती
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूर बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी भारताच्या तिन्ही सैन्यदलांचं कौतुक केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा नवा भारत असून संपूर्ण देश या कारवाईकडे वाट पाहत होता. त्यामुळे ही कारवाई होणारच होती, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
 
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तीगतरित्या या 'ऑपरेशन सिंदूर'वर लक्ष ठेवून होते. त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, वरिष्ठ गोपनीय अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रत्येक वेळेची अपडेट देत होते. भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर करण्यात आली असून ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.
 
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\