ऑपरेशन सिंदूर’ ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

07 May 2025 15:05:50
India launches Operation Sindoor strikes 9 terrorist sites in Pakistan & POK.


नवी दिल्ली :(Operation Sindoor) दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.


‘सिंदुर’चा ‘सिंदूर’ने बदला!


पहलगाम हल्लाचा बदला कसा घेतला जाईल, यांची प्रतिक्षा भारताला नव्हे तर संपूर्ण जगालाच होती, ती मंगळवारी मध्यरात्री संपली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री उशिरा १.३० वाजता संयुक्त कारवाई करत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये (पीओके) असलेल्या ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून उध्वस्त केले.


या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या आत १०० किमी अंतरावर असलेल्या ४ दहशतवादी तळांना लक्ष्य केले आणि पीओकेमधील पाच तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याद्वारे, भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने पहलगामच नव्हे तर मुंबई हल्ला, संसद हल्ला आणि भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्लाचा हा बदला आहे असा सुर जनतेतून येत आहे पहलगाम हल्ल्यात महिलांच्या समोर त्यांच्या पतीना मारले गेले होते. त्यामुळे या संपूर्ण ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे.

ऑपरेशन कसे पार पडले?


पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार हल्ला करण्याची तयारी सुरू होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीने संपूर्ण जगाला सांगले की, ‘ये नया भारत है’. पंतप्रधान मोदीजीच्या नेतृत्वखाली पहलगाम हल्ल्याच्या विरूध्दात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले त्यापैंकी सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून लावण्याचे आदेश देणे समाविष्ट होते.


ऑपरेशन कसे पार पडले!


पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार हल्ला करण्याची तयारी सुरू होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीने संपूर्ण जगाला सांगले की, ‘ये नया भारत है’. पंतप्रधान मोदीजीच्या नेतृत्वखाली पहलगाम हल्ल्याच्या विरूध्दात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले त्यापैंकी सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना देशातून हाकलून लावण्याचे आदेश देणे समाविष्ट होते.

ही कारवाई करण्यापूर्वी, भारतीय गुप्तचर संस्था रॉ ने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची ओळख पटवली आणि तेच ठिकाण निर्धारीत करून, मंगळवारी रात्री उशिरा, हॅमर आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सुसज्ज राफेल लढाऊ विमानांनी एअरबेसवरून उड्डाण घेतले आणि पूर्व-निर्धारित ठिकाणावर दारूगोळा टाकला.

ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूर'!


भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन युद्धे लढली आहेत आणि तिन्ही वेळा पराभूत केले आहे. यानंतर, भारतीय सैन्याने हवाई हल्ले आणि सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. बालाकोट आणि उरी स्ट्राइक या पाकिस्तान व्याप्त काश्मिर(पीओके) करण्यात आले होते. पण यावेळेस भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत १०० किमी आत जाऊन दहशतवादावर हल्ला केला आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला आणि बदला घेतला. यानंतर, २०१९ मध्ये, पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर, भारतीय सैनिकांनी हवाई हल्ला केला. यावेळी पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने ‘घर में घुसके मारेंगे’ या नीतीव्दारे मोठी कारवाही केली.

 
Powered By Sangraha 9.0