भारताच्या एअर स्ट्रईकमध्ये हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दासिर ठार!

07 May 2025 13:27:43

Abdul Malik Mudassir killed during Operation Sindoor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Abdul Malik & Mudassir killed during Operation Sindoor)
भारताने पाकिस्तान विरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना योग्य उत्तर दिले आहे. बुधवारी पहाटे झालेल्या या गुप्त कारवाईत भारताने पाकिस्तानात १०० किमी आत घुसून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. मोठी गोष्ट म्हणजे मरकज तैयबावरील हल्ल्यात लष्करचे दोन उच्च दर्जाचे दहशतवादी हाफिज अब्दुल मलिक आणि मुद्दासिर मारले गेले आहेत. या दोघांनाही लष्करच्या दहशतवादी कारवायांचे सूत्रधार मानले जात होते.

हे वाचलंत का? : बदला! 'Operation Sindoor' राबवत अधर्मावर धर्माचा विजय

हाफिज अब्दुल मलिक पाक लष्करचा एक मोठा ऑपरेशनल कमांडर असल्याचे म्हटले जाते. तो मुरीदके येथील लष्कराच्या मुख्यालय 'मरकझ तैयबा' येथे उपस्थित होता, जिथे हल्ला झाला. दुसरा दहशतवादी मुद्दासिर होता, जो परदेशी दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या लष्करच्या कटाचा सूत्रधार मानला जातो. दोघांचाही या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या कारवाईकडे भारताचे दहशतवादाविरुद्धचे कठोर धोरण म्हणून आज पाहिले जात आहे.

भारताने लक्ष्य केलेल्या दहशतवादी अड्ड्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट आहे. याशिवाय लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये करण्यात आला, जो आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १०० किमी आत आहे आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे, सांबा सेक्टर सीमेपासून ३० किमी अंतरावर मुरीदके नावाच्या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाचा एक तळ होता, तो ही जमीनदोस्त झाला आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसाब आणि त्याचे सहकारी येथूनच आले होते. अजमल कसाबने येथे प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये संघटनेचे मुख्यालय देखील समाविष्ट आहे, ज्याला डेव्हिड हेडली आणि तहव्वुर राणा यांनी भेट दिली होती.

Powered By Sangraha 9.0