सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहाता येणार न्यायाधीशांची संपत्ती
एकूण ३३ पैकी २१ जणांनी जाहीर केली संपत्ती... अद्याप १२ जणांची माहिती प्रलंबित
06-May-2025
Total Views |
नवी दिल्ली :(Assets of Supreme Court Judges) न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढवण्याचा दिशेने सर्वोच्च न्यायालयाने, सोमवार दि. ५ मे रोजी न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली.
न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण ३३ न्यायाधीशापैंकी सध्या २१ न्यायाधीशांची मालमत्ता संबधित माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.
त्यात सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि नजीकच्या काळात सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर येणारे तीन न्यायाधीश समाविष्ट आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना न्या. यशवंत वर्मा यांच्या राहत्या निवासस्थानी रोख रकमेच्या जप्तीमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय न्यायाधीशांची पारदर्शिकता जनतेसमोर राहवी यासाठी घेण्यात आला.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, जिथे सर्व न्यायाधीशांनी त्यांची मालमत्ता सार्वजनिक करण्यास सहमती दर्शविली. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांचे मालमत्तेचे विवरणपत्र सरन्यायाधीशांना सादर करणे आवश्यक होते, परंतु आता ते सार्वजनिकरीत्या उपलब्ध असेल.