मॉक ड्रील म्हणजे काय? सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर!

06 May 2025 19:30:26

mock drill
 
नवी दिल्ली: (Mock Drill) मंगळवार,दि. ६ : केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी मंगळवारी देशभरात आज होणाऱ्या प्रभावी नागरी संरक्षणासाठी होणाऱ्या मॉक ड्रिल्सबाबत एक बैठक घेतली. गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महासंचालक नागरी संरक्षण आणि महासंचालक एनडीआरएफ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. आम्ही तयारीचा आढावा घेत आहोत. ज्या त्रुटी दूर करायच्या आहेत त्या ओळखल्या गेल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण तयारीला चालना देण्यासाठी, केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी २४४ वर्गीकृत जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण सराव आणि तालीम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आर्थिक राजधानी मुंबई, देशातील प्रमुख महानगरे, सीमावर्ती राज्ये आणि सीमावर्ती गावांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महत्वाच्या केंद्रीय संस्था आणि आस्थापनांचाही यामध्ये समावेश आहे.
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की या सरावाचे उद्दिष्ट राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नागरी संरक्षण यंत्रणेची तयारी मूल्यांकन करणे आणि वाढवणे आहे. हा सराव गावपातळीपर्यंत नियोजित आहे. गृह मंत्रालयाने ७ मे २०२५ रोजी देशातील २४४ वर्गीकृत नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण सराव आणि तालीम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे.
मॉक ड्रिलच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये हवाई हल्ल्याच्या चेतावणी प्रणालींच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करणे, हॉटलाइनचे कार्यान्वित करणे, आयएएफशी रेडिओ कम्युनिकेशन लिंक्स, नियंत्रण कक्ष आणि छाया कक्षांच्या कार्यक्षमतेची चाचणी करणे, शत्रुत्वाच्या हल्ल्यात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांना नागरी संरक्षण पैलूंवर प्रशिक्षण देणे आणि क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद करणे समाविष्ट आहे.
या उद्दिष्टांमध्ये महत्त्वाच्या प्रतिष्ठानांचे लवकर क्लॉफ्लॅगिंग करण्याची तरतूद, वॉर्डन सेवा, अग्निशमन, बचाव कार्य आणि डेपो व्यवस्थापन यासह नागरी संरक्षण सेवांच्या सक्रियतेची आणि प्रतिसादाची पडताळणी करणे, क्रॅश ब्लॅकआउट उपायांच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे आणि निर्वासन योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीची तयारी यांचे मूल्यांकन करणे यांचा समावेश आहे.
नागरी संरक्षण मॉक ड्रिल म्हणजे काय?
नागरी संरक्षण मॉक ड्रिलमध्ये युद्ध परिस्थितींप्रमाणेच हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जातात, शहरांमध्ये ब्लॅक आऊट केले जाते, नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थानात हलवले जाते आणि आपत्कालीन पथके त्यांची भूमिका बजावतात. नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि आपत्ती दरम्यान भीती, गोंधळ आणि नुकसान कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. याअंतर्गत शांततेच्या काळातही जागतिक स्तरावर धोरणात्मक तयारी मजबूत केली जात आहे, जेणेकरून सरकार आणि सामान्य जनता संकटाच्या वेळी पूर्णपणे तयार राहतील.
नागरी संरक्षण जिल्हे म्हणजे काय?
नागरी संरक्षण जिल्हे हे विशेषतः चिन्हीत केलेले जिल्हे असतात. जेथे आपत्ती किंवा युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण आणि मदत करण्यासाठी विशेष व्यवस्थापन आणि प्रशिक्षण दिले जाते. या जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणा, पोलिस, निमलष्करी दल आणि नागरी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
मॉक ड्रिलमध्ये काय होईल?
आज होणाऱ्या या मॉक ड्रिलमध्ये खालील उपक्रम राबवले जातील:
  • सार्वजनिक इशारा प्रणाली तपासणे: सायरनद्वारे जनतेला सावध करण्याची प्रणाली तपासली जाईल.

  • टेलिफोन आणि रेडिओ लिंक चाचणी: भारतीय हवाई दलासह हॉटलाइन आणि रेडिओ संप्रेषणाची चाचणी.

  •  नियंत्रण आणि शॅडो कक्षांची तयारी: आपत्कालीन समन्वयासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षांच्या कार्यप्रणालीची चाचणी घेणे.

  • नागरिकांचे प्रशिक्षण: मर्यादित संघर्षाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण आणि सुरक्षिततेचे उपाय शिकवले जातील.

  •  ब्लॅकआउट तंत्रे: आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करून ब्लॅकआउट प्रक्रियेचा सराव.

  • कॅमफ्लाज तयारी: संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाच्या संस्थांना कव्हर करण्यासाठी सराव.

  • बचाव पथकाचा प्रतिसाद: अग्निशमन दल, बचाव पथके, देखभाल कर्मचारी आणि नागरी वॉर्डन यांच्या तैनाती आणि कामकाजाचे निरीक्षण करणे.

  • स्थलांतर योजनांचा आढावा: आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या धोरणांची तपासणी.



Powered By Sangraha 9.0