मेट गाला २०२५ कार्यक्रमात मातृत्वाचा ठसा: कियारा अडवाणी हीचा भावनिक आणि स्टायलिश प्रवास!

06 May 2025 13:42:10


motherhood at the met gala 2025 kiara emotional and stylish journey


मुंबई : मेट गाला २०२५ मध्ये आपल्या पहिल्यावहिल्या उपस्थितीसाठी सज्ज होत असलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आपल्या गर्भातील बाळाशी संवाद साधताना, पिझ्झाचा आस्वाद घेताना आणि आपल्या ‘नवीन शरीरात’ हॉट वाटत असल्याचं सांगताना दिसते.
 
गर्भवती असलेल्या कियाराने या खास क्षणात आपल्या प्रेग्नन्सीचा आत्मविश्वासपूर्वक स्वीकार करत डिझायनर गौरव गुप्ताशी आपल्या लूकबाबत संवाद साधताना सांगितलं की, “माझ्या आयुष्याच्या या नव्या टप्प्याचं प्रतिबिंब माझ्या पोशाखात उमटावं, ही माझी इच्छा होती. ही थीम मी माझ्या बाळासाठी साकारत आहे... जसं आंद्रे लिऑन टॅली यांनी पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा केला, तसं काहीतरी मीही करत आहे.”
 
ती म्हणाली, “बर्‍याच काळानंतर मला असं वाटतंय की हे माझं नवीन शरीर आहे, आणि मी या शरीरात खरंच हॉट वाटतेय.”
 
या खास पोशाखाची कल्पना ‘ब्रेवहार्टस’ नावाने गौरव गुप्ताने साकारली असून, मेट गालाच्या 2025 च्या ‘Superfine: Tailoring Black Style’ या थीमशी सुसंगत आहे. पोशाखात सोन्याच्या शिल्पासारखे दोन क्रिस्टलने सजवलेले हृदय दाखवले असून त्यांना जोडणारी साखळी ही आई-बाळामधील गर्भनाळ दर्शवते. याला जोडून दोन पांढऱ्या पॅनेल्सचा केप आहे, ज्यातून 2010 मधील आंद्रे लिऑन टॅली यांचा लूक साकारण्यात आला आहे. अनायता श्रॉफ अदाजानियाने कियारा आणि गौरव यांच्यातील ही कलात्मक जुळवाजुळव घडवून आणली.
 
कियारा अडवाणीने मेट गालाच्या पायऱ्यांवर आपल्या बाळाचा उल्लेख करत म्हटलं, “अंबिलिकल कॉर्ड ही एक खूप गोड कल्पना आहे... जणू मी माझ्या बाळाला सांगतेय, ‘हे बघ, आपण मेटच्या स्टेप्सवर आहोत!’”
 
 
कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा फेब्रुवारी २०२५ मध्ये आपलं पहिलं मूल येणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. दोघांनीही इंस्टाग्रामवर छोट्या बेबी सॉक्ससह फोटो शेअर करत लिहिलं, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट येत आहे.” त्यांनी २०२३ मध्ये जैसलमेरमध्ये विवाह केला होता आणि २०२० पासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु आहे. २०२१ मध्ये दोघं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र झळकले होते.
 
कियाराचा हा मेट गालातील पहिला प्रवेश केवळ तिच्या स्टाईलमुळेच नव्हे, तर आई म्हणून ती अनुभवत असलेला भावनिक प्रवास आणि आत्मविश्वास यामुळेही लक्षवेधी ठरला आहे.



Powered By Sangraha 9.0