राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'या' दिवशी सबरीमाला मंदिराला भेट देणार

06 May 2025 17:27:44

draupadi murmu sabarimala

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (draupadi murmu sabarimala) 
देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवार, दि. १९ मे रोजी केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिरास भेट देणार आहेत. सबरीमाला मंदिरास भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती असतील. केरळच्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) राष्ट्रपतींच्या भेटीसंदर्भात पुष्टी केली.

हे वाचलंत का? : वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दि. १८ मे पासून केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. या काळात त्या कोट्टायममधील एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दि. १९ मे रोजी शबरीमला मंदिराला भेट देतील. तत्पश्चात पम्पा बेस कॅम्पला पोहोचतील. टीडीबीचे अध्यक्ष पी.एस. प्रसांत म्हणाले की, देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच सबरीमाला मंदिराला भेट देणार आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रपतींच्या भेटीची तयारी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. रस्त्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामाचे काम सुरू झाले आहे.

 
Powered By Sangraha 9.0