भारतात मुले दत्तक घेण्यासाठी इतका वेळ का लागतो? उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत प्रक्रिये सुलभतेविषयी मागविला अहवाल

    06-May-2025
Total Views |

child adoption  
 
मुंबई :(Children Adoption Policy) भारतात मुले दत्तक घेण्यासाठी दत्तक पालकांना करावा लागणारा प्रतीक्षा कालावधी हा दीर्घ असल्यामुळे अनेक अडचणीला समोर जावे लागते, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सुओ मोटो दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावत या संदर्भातील विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
सोमवार, दि .५ मे रोजी उच्च न्यायालयाने एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताच्या आधारे ही सुओ मोटो दाखल केली आहे. भारतात मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हा प्रचंड आहे. एकूण २४०० मुले दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत पात्र आहेत. मात्र, दत्तक घेणाऱ्यांची संख्या ही सुमारे ३५ हजार ५०० इतकी आहेत. ज्यामुळे मुल दत्तक घेण्यासाठी पालकांना दीर्घ प्रतिक्षा करत रहावी लागते.
 
प्रकाशित झालेल्या वृत्तात मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना लागणारा कालावधी आणि अन्य तक्रारीची विस्तृत नोंद होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने सुओ मोटो दाखल केली आहे. या याचिकेनुसार, ‘भारतातील अनेक पालकांसाठी मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया एक आव्हान बनली आहे. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नवजात किंवा लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी सरासरी साडेतीन वर्षे वाट पहावी लागते.’
 
उच्च न्यायालय म्हणाले की, ‘बातमीनुसार, दत्तक घेण्यासाठी फक्त २,४०० मुले उपलब्ध होती जे की एकूण ३५,५०० संख्येत दत्तक घेण्यासाठी नोंदणी झाली आहे. या २,४०० मुलांपैकी फक्त ९४३ मुलांना ‘सामान्य’ म्हणून सांगितले आहे. खंडपीठाने या प्रकरणात वरिष्ठ वकील डॉ. मिलिंद साठे आणि वकील गौरव श्रीवास्तव यांना अमिकस क्युरी म्हणून नियुक्त केले. यासंदर्भात न्यायालयाने संबधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. पुढील सुनावणी ही २३ जून रोजी होणार आहे.