फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्रीवर पण दावा ठोका! सुलताना बेगमला सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल
म्हणे संपूर्ण लाल किल्ल्याची जमीन आमची...
06-May-2025
Total Views |
नवी दिल्ली :(Claim on Red Fort) मुघल शासक बहादूर शाह जफरचा वारस असल्याचे सांगत दिल्लीतील लाल किल्लावर दावा ठोकणाऱ्या सुलताना बेगमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आपला ताबा सोमवार, दि. ५ मे रोजी ‘सुलताना बेगम विरुद्ध भारत संघ’ या प्रकरणात सुलताना बेगम यांनी मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा वारस असल्याने लाल किल्ल्याचा मालकी हक्क मिळावा यासाठी याचिका केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका का फेटाळून लावली?
या प्रकरणात २० डिसेंबर २०२१ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने १५० वर्षांहून अधिक विलंब झाल्याचे सांगुन लाल किल्ल्यावर ताबा मागणारी याचिका फेटाळून लावली.
सुलताना बेगम यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, लाल किल्ल्याची ती खरी मालकीण आहे कारण तिला तिचे पूर्वज बहादूर शाह जफर कडून ही मालमत्ता वारशाने मिळाली होती, या याचिकेत त्यांनी म्हटले होते की, १८५७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्या पुर्वजाकडुन जबरदस्तीने हा ताबा काढून घेतला होता आणि भारत सरकार अशा मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा करत आहे.यानंतर, डिसेंबर २०२४ मध्ये, सुलतानाने दुसऱ्यांदा याचिका दाखल केली. पण मुख्य न्यायाधीश विभू बाखरू आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने फेटाळले
फक्त लाल किल्ला का? फतेहपूर सिक्री पण मागा?
सुलताना बेगम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका केली असता, मुख्य न्या. संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. याचिकेला उत्तर देत मुख्य न्या. खन्ना यांनी व्यंग्यात्मकपणे प्रश्न विचारला की, "फक्त लाल किल्ला का? फतेहपूर सिक्री पण मागा ?" खंडपीठाने निरीक्षणे नोंदविले असता ही याचिका पूर्णपणे चुकीची आहे असे मत व्यक्त करून याचिका फेटाळून लावली.
कोण आहेत रझिया सुलताना बेगम?
रझिया सुलताना बेगमचा यांनी दावा केला आहे की ती मुघल सल्तनतचा शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर यांचे पणतू मिर्झा बेदर बख्त यांची पत्नी आहे. १५ ऑगस्ट १९६५ रोजी सुलताना १२ वर्षांची असताना त्यांचे लग्न झाले. मूळ लखनौच्या असलेल्या सुलतानाचे बालपण कोलकाता येथील तिच्या आजोबांच्या घरी गेले. सध्या ती हावडाच्या शिवपुरी भागातील एका कॉलनीत राहत आहे.