आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली वसईतील विविध विकासकामांची पाहणी
06-May-2025
Total Views | 26
वसई: (Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात खालील ठिकाणी भेट देण्यात आली:
१)नरवीर चिमाजी आप्पा स्मारक कामाची पाहणी
२)नवघर स्मशानभूमी येथील नाल्याची पाहणी
३)कलवर्ट क्रमांक ८७ येथील नाल्याची पाहणी
४)वसई-विरार महानगरपालिका श्वान निर्बीजीकरण केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली.
५)सूर्या गार्डन येथील नाल्याची पाहणी
६)माणिकपूर नाका ते दत्तानी येथील पॅचवर्क कामाची पाहणी
७)दत्तानी समोरील नाल्याची पाहणी
८)म्हांबरे येथील नाल्याची पाहणी
९)तांदूळ बाजार बंगाली येथील नाल्याची पाहणी
१०)पाचू बंदर येथील नाल्याची पाहणी
११)किल्ला बंदर येथील नाल्याची पाहणी
यावेळी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त नानासाहेब कामठे, सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर, अलका खैरे, शहर अभियंता रमेश पाचंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश साटम, निलेश धुमाळ, स्वच्छता निरीक्षक प्रभाकर धुमाळ, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी, वसई पाटील मंडळ अध्यक्षआशिष जोशी, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित कामे वेळेत आणि दर्जेदार रीतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या तत्काळ निकाली काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.