Mock Drill in Maharashtra : महाराष्ट्रात 'या' १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल!

06 May 2025 13:10:49

India Vs Pakistan War Mock Drill in Maharashtra
 
मुंबई : (Mock Drill in Maharashtra) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव दिवसागणिक वाढत आहे. युद्धाचे ढग गडद झाले आहेत. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने ७ मे रोजी 'मॉक ड्रिल' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वतःचा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
 
महाराष्ट्रातील पुढील १६ ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील : 
 
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0