‘वक्फ’ कायदा आव्हान याचिकांवर दि. 15 मे रोजी सुनावणी

06 May 2025 12:42:19
 
Hearing on petitions challenging the Waqf Act on May 15
 
नवी दिल्ली : (Hearing on petitions challenging the Waqf Act on May 15) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘वक्फ (सुधारणा) कायदा, 2025’ला आव्हान देणार्‍या याचिकांची सुनावणी गुरुवार, दि. 15 मे रोजी भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवली आहे.
 
भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. संजीव खन्ना दि. 13 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि न्या. गवई दि. 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. “अंतरिम आदेश देण्यासाठीही दीर्घ सुनावणी आवश्यक आहे,” असे सरन्यायाधीश खन्ना म्हणाले. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण न्या. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवले आहे.
 
सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की त्यांनी केंद्राने दाखल केलेल्या प्रति-प्रतिज्ञापत्राचा आणि या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांच्या प्रतिज्ञापत्रांचा आढावा घेतला आहे आणि ‘वक्फ मालमत्ते’च्या नोंदणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0