दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आजपासून व्यवासायिक नाट्यस्पर्धेची नांदी!

06 May 2025 11:11:05

shivaji natyamandir

मुंबई : मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण नाटकांचा सोहळा रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. ६ मे पासून १६ मे पर्यंत दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.

मराठीच्या अभिजात नाट्यसृष्टीतील विविधतेने नटलेले प्रयोग यावेळी रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या नाट्यस्पर्धेला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यनमातून करण्यात आले आहे. नाट्यगृहातील काही जागा निमंत्रितांसाठी राखीख असून, त्या त्या नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु होईल. मंगळवार दि. ६ मे रोजी रात्री ८:३० वाजता उर्मिलायन या नाटकाने व्यवसायिक नाट्यस्पर्धेची सुरुवात होईल आणि ' वरवरटे वधू वर' या नाटकाने १६ मे रोजी ही व्यवसायिक नाट्यस्पर्धा समाप्त होईल.

Powered By Sangraha 9.0