निवडणुकीतील यशाबद्दल लॉरेन्स वाँग यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

    05-May-2025
Total Views |

pm modi congratulates Lawrence Wong on election victory
 
नवी दिल्ली : ( pm modi congratulates Lawrence Wong on election victory ) लॉरेन्स वाँग यांनी निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यात असलेल्या घनिष्ट संबंधांच्या आधारावर निर्माण झालेल्या सशक्त तसेच बहुआयामी भागीदारीवर त्यांनी अधिक भर दिला.
 
लॉरेन्स वाँग यांना ‘एक्स’ मंचावर संबोधित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “लॉरेन्स वाँग, तुम्ही सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
 
भारत आणि सिंगापूर या देशांतील जनतेमध्ये असलेल्या दृढ संबंधांच्या पायावर हे दोन्ही देश एक सशक्त, तसेच बहुआयामी मित्र आहेत. आपल्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी तुमच्यासह एकत्र येऊन काम करत राहण्यासाठी मी उत्सुक आहे.”