पहिले धर्मांतर मग लग्नाचं आश्वासन, नकार दिल्यानंतरही शारीरिक संबध; एजाज खानवर बलात्काराचा आरोप! सविस्तर वाचा...

    05-May-2025   
Total Views |


ajaz khan accused of rape case

मुंबई : अभिनेता एजाज खानवर रविवारी एका महिला अभिनेत्रीनं बलात्काराचा आरोप करत चर्कोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटसृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे. याआधीच ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमुळे एजाज खान वादात सापडले असून, त्याविरोधात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली होती.
 
 
 
तक्रारीनुसार, पीडित अभिनेत्रीला ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये सूत्रसंचालनासाठी बोलावण्यात आलं होतं. या शोच्या शूटिंगदरम्यान एजाज खानने तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि धर्मांतर करून विवाह करण्याची प्रस्तावनाही मांडली. मात्र, तिच्या नकारानंतरही त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
 
 
 
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ६४, ६४(२एम), ६९ आणि ७४ नुसार बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
 
 
दरम्यान, एजाज खान आणि उल्लु अॅप चे सीईओ विभू अग्रवाल यांच्यावर याआधीच ‘हाऊस अरेस्ट’ शोमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. शोचे काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर मोठा वाद निर्माण झाला. या क्लिप्समध्ये अजाज खान महिलांना कपडे काढून पुरुष स्पर्धकांसोबत अश्लील पद्धतीने अभिनय करण्यास सांगत असल्याचे दिसून आले. यावरून राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) याची गंभीर दखल घेत, अजाज खान व विभू अग्रवाल यांना ९ मे रोजी समोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.