पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेर अटकेत

    05-May-2025
Total Views |
 
Two Pakistani arrested in Punjab
 
चंदीगढ : ( Two Pakistani arrested in Punjab ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब पोलिसांनी दोन पाकिस्तानी हेरांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अमृतसरमधील आर्मी कॅन्टोन्मेंट आणि हवाई दलाच्या तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होते.
 
या आरोपींकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये लष्कराच्या हालचाली आणि हवाई दलाच्या तळाचे फोटो सापडले आहेत. हे दोघेही अमृतसर तुरुंगात असलेल्या हरप्रीत सिंग ऊर्फ पिट्टू ऊर्फ हॅप्पीमार्फत ‘आयएसआय’शी जोडले गेले होते. आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी आहेत.
 
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणात अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतसर ग्रामीण पोलीस लवकरच याबद्दल अधिक माहिती देतील.”