स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिपची चाचणी यशस्वी

- ‘डीआरडीओ‘ने 17 किमी उंचीवर केली चाचणी; गुप्तचर माहिती गोळा करणार

    05-May-2025
Total Views |
 
Stratospheric airship test successful
 
नवी दिल्ली: ( Stratospheric airship test successful ) ‘भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटने’ने (डीआरडीओ) शनिवार, दि. 3 मे रोजी मध्य प्रदेशातील श्योपूर चाचणीस्थळावरून ’स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म’ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. हे एअरशिप ‘डीआरडीओ’च्या आग्रा येथील ‘एरियल डिलिव्हरी रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ (एडीआरडीई)ने विकसित केले आहे. हे एअरशिप 17 किमी उंचीवर इंस्ट्रुमेंटल पेलोडसह प्रक्षेपित करण्यात आले. हे विमान 62 मिनिटे उडाले. यानंतर टीमने सिस्टम यशस्वीरित्या पुनर्प्राप्त केली.
 
हे एअरशिप एकाच ठिकाणी बराच काळ स्थिर राहू शकते आणि सातत्याने तत्कालिक डेटा पाठवू शकते. या यशासह स्वदेशी तंत्रज्ञानात स्वयंभू असणार्‍या देशांमध्ये सामील झाला आहे.
 
या कामगिरीबद्दल माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “उड्डाणादरम्यान या स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिपमधील दाब नियंत्रित करणारी प्रणाली (एनक्लोजर प्रेशर कंट्रोल) आणि आपत्कालीन परिस्थितीत हवा बाहेर काढण्यासाठीची प्रणाली (इमर्जन्सी डिफ्लेशन सिस्टम) यांचीदेखील चाचणी घेण्यात आली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, सिस्टम सुरक्षितपणे परत आणण्यात आली.
 
भारतीय सैन्य अधिक मजबूत होणार
 
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या प्रणालीच्या डिझाईन, विकास आणि चाचणीमध्ये सहभागी असलेल्या ‘डीआरडीओ’ टीमचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “हे प्रोटोटाईप उड्डाण हवेपेक्षा हलक्या उंचीच्या प्लॅटफॉर्म सिस्टमच्या निर्मितीच्या दिशेने एक मैलाचा दगड आहे, जे स्ट्रॅटोस्फेरिक उंचीवर दीर्घकाळ उंच राहू शकते.”