ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर तुम्ही अनुसूचित जातीचे सदस्य म्हणून राहु शकत नाही : उच्च न्यायालय

मारहाणीविरोधात ॲट्रोसिटी दाखल करणाऱ्या पादरीला न्यायालयाने सुनावले खडे बोल

    05-May-2025
Total Views |
 
sc st act
 
 
अमरावती :(Prevention of Atrocities Act) ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी आणि सक्रियपणे त्या धर्माची आचरण करणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा भाग राहू शकत, असे म्हणत एका पादरीची आंध्र पद्रेश न्यायालयाने कानउघडणी केली आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९च्या संदर्भात एका खटल्यातील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
 
या प्रकरणात तक्रारदार मडिगा या जातीतील आहेत, अनुसूचित जाती वर्गात ही जात येते. मात्र, तक्रारदाराने ख्रिस्ती धर्म स्विकारला. इतकेच नाही तर तो पादरी म्हणून धर्मप्रसाराचे कामही करत होता. दरम्यान, तक्रारदार अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याचा वापर करू शकतो की, नाही हा प्रश्न न्यायालयासमोर आल्यावर हा निकाल दिला.
 
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्या. हरिनाथ एन. यांच्या खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, “जाती व्यवस्था ख्रिश्चन धर्मासाठी परकी आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर आणि चर्चमध्ये एक पादरी म्हणून भूमिका पार पाडत आहात, त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या तरतुदी तुम्हाला लागू करू शकत नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
न्यायालयाने म्हटले की "अनुसूचित जाती आणि जमातींच्या सदस्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी एससी एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा हा एक संरक्षणात्मक कायदा आहे. सध्याच्या प्रकरणात, तक्रारदाराने स्वेच्छेने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि गेल्या १० वर्षांपासून चर्चमध्ये ते पाद्री म्हणून काम आहेत, हे त्यांनी मान्य आहे. म्हणून या प्रकरणात संरक्षणात्मक कायद्याच्या तरतुदी लागू होण्याचा प्रश्नच नाही."
 
त्यानंतर तक्रारदाराने असा युक्तिवाद केला की धर्मांतर असूनही, त्याच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे, परंतु न्यायालयाने उत्तर देत असे म्हटले की " जो ख्रिश्चन धर्मात रूपांतरित झाले त्याचे जात प्रमाणपत्र केवळ अधिकार्‍याने रद्द न केल्याने संरक्षणात्मक कायद्यांतर्गत दिलेले संरक्षण त्यांना मिळू शकत नाही.”
 
अत्याचार प्रतिबंधक कायदा काय म्हणतो?
 
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३ मध्ये हे स्पष्ट तरतुद आहे. की केवळ अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती समुदायातील व्यक्तीच कायद्याच्या वापर करू शकते. त्यामुळे या प्रकरणात तक्रारदाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि सुमारे १० वर्षांपासून चर्चमध्ये एक पादरी म्हणून काम केले होते, त्यामुळे या कायद्याचे संरक्षण घेणे हे असंवैधानिक आहे, अशा शब्दांत त्यांनी पादरीची कानउघडणीक केली.