Maharashtra HSC Result 2025 : आज दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल! 'या' वेबसाइट्सवर पाहता येणार

    05-May-2025   
Total Views |

Maharashtra HSC Result 2025
 
मुंबई : (Maharashtra HSC Result 2025) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल सोमवार दि. ५ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार असल्याचे जाहीर केले. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवार दि. ६ मे पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
 
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा पाहाण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील :
 
 
बारावीचा निकाल संकेतस्थळावर कसा तपासायचा?
 
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
 
- होमपेजवरील HSC च्या लिंकवर क्लिक करा.
 
- तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
 
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. सेव्ह करा आणि प्रिंट करा.
 
विद्यार्थ्यांना निकालात संपूर्ण विषयाचे गुण दिसणार आहे. त्यामुळे ऑनलाईन निकाल पाहताना कोणत्या विषयात किती गुण मिळाले, याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\