मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
- राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
05-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भेटीविषयी मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वरून माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी, केंद्र शासनाकडून मान्यता मिळवण्यास महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या विषयांबाबत पाठपुरावा केला आणि चर्चा केली.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या डिस्टिंक्ट अभिमत विद्यापीठाविषयीच्या बैठकीचे अध्यक्षस्थानही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुषविले. विद्यापीठाच्या संकल्पनेवर विचारविनिमय करण्यासाठी तज्ज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यशाळेस उपस्थित राहून संबोधित केले आणि तज्ञांचे विचार जाणून घेतले.