_202505042013322848_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
कोल्हापूर – गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ मेपासून लागू करण्यात येणार आहे. मुंबई व पुण्यात गोकुळ दूध प्रतिलिटर ७४ रुपयांनी, तर कोल्हापूर आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ६८ रुपयांना विकले जाणार आहे.
गोकुळ दूध हा राज्यातील एक प्रमुख दूध उत्पादक संघ आहे. लाखो ग्राहकांना दररोज गोकूळ कडून दूध पुरवठा होतो. जानेवारी महिन्यात गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेच काही महिन्यांत पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दूध उत्पादकांच्या मते, चाऱ्याचे आणि इंधनाचे वाढलेले दर यामुळे उत्पादकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. म्हणून दरवाढ गरजेची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. पण अशीच दरवाढ होत राहीली तर सर्वसामान्य माणसांच्या खर्चात वाढ होणार आहे.
दुधाच्या झालेल्या दरवाढीमुळे बाजारातील बाकीचे दुग्धजन्य पदार्थ उदा. तूप, दही, चीज यांच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. दूधाचे दर वाढल्यामुळे उत्पादकांना फायदा होणार असला तरी ग्राहकांची खर्चाची गणिते बीघडणार आहेत.