तुम्ही कधी काळा तांदूळ खाल्ला आहे का? किंमत किती? कुठे मिळतो?

30 May 2025 21:08:58

तुम्ही कधी काळा तांदूळ खाल्ला आहे का? किंमत किती? कुठे मिळतो?

सोशल मीडिया इन्फ्लूएझर्समध्ये अचानक काळा तांदूळ हा प्रसिद्ध होऊ लागला आहे. मात्र, हा तांदूळ नेमका कुठे पिकतो? कुठे विकाला जातो? त्याची किंमत किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती



भारतात तांदूळ उत्पादनाला मोठे महत्त्व आहे. भारत देश हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आणि जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार म्हणून ओळखला जातो. तांदूळात विविध प्रकार आढळतात, तसाचं ’काळा’ तांदूळ हा सूधा एक तांदूळाचा प्रकार आहे ज्यास ‘फॉरबिडन राईस’ किंवा ‘काळा चोलावार तांदूळ’ असंही म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात काळ्या तांदूळाची लागवड चीनमधील मोठ्या राजघराण्यातल्या लोकांसाठी केली जायची. सामान्य लोकांना या तांदूळाची लागवडीची परवानगी नव्हती. म्हणून यास ‘फॉरबिडन राईस’ म्हटले जाते. जपान, चीन, फिलिपाईन्स या देशांमध्ये याला ‘पर्पल राईस’म्हणून ओळखले जाते.


काळ्या तांदूळाचे उत्पादन कुठे होते?



काळ्या तांदूळाचे उत्पादन भारतात मणिपूर, ओडिशा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छतिसगड आणि झारखंड मघ्ये होतो. मात्र प्रत्येक राज्यात या तांदळाला वेगळे नाव आहे व उत्पादनाची वेगळी पध्दत आहे. मणिपूर येथे ‘चाक-हाओ’ नावाने ओळखला जातो व पारंपरिक आणि जैविक पद्धतीने पिकवला जातो. ओडिशामध्ये आदिवासी भागांमध्ये याचे सेंद्रीय उत्पादन होते. पश्चिम बंगाल आणि उत्तर बंगालमध्ये खास करून काळ्या तांदळाचे उत्पादन वाढले आहे. तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या जाती मिळतात. महाराष्ट्रात विदर्भ व काही भागांत सेंद्रिय शेतकरी काळा तांदूळ पिकवत आहेत.



काळ्या तांदूळाची किंमत जास्त का?



काळा तांदूळ हा सामान्य तांदळाच्या तुलनेत महाग असतो कारण, हा आरोग्यदायी व पौष्टीक गुणधर्माणमध्ये अधिक उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. यामध्ये फायबर, लोह व तांबे या घटकांचे प्रमाण नेहमीच्या तांदूळापेक्षा अधिक असते. यात ‘अँटिऑक्सिडंट्स’चं प्रमाण अधिक आहे. काळ्या तांदळाचं उत्पादन मर्यादित असल्या कारणाने याची विक्रीही कमी प्रमाणात होते व या तांदूळाची उत्पादन प्रकियाही मोठी व जास्त खर्चिक आहे. म्हणून काळ्या तांदूळाची किंमत साध्या तांदूळा पेक्षा जास्त आहे.


2025 मध्ये सरासरी किंमत (प्रति किलो) किती आहे?



२०२५ मध्ये काळ्या तांदूळाची किंमत प्रति किलो किती जाणून घेऊया,सध्या ऑनलाइनच्या दूनियेत किराणा माल ही ऍपच्या सहाय्याने मागवता येतो, तसेच काळा तांदूळ हि ऑनलाइन ऍप द्वारे मागवता येतो फक्त फरक इतकाच की स्थानिक बाजारात मिळणाऱ्या किंमती पेक्षा थोड महाग असतं. स्थानिक बाजारात किंवा थेट शेतकऱ्यांकडून १८० ते ३०० रुपयांमध्ये विकत घेऊ शकतो. ऑनलाइन मार्केट म्हणजे (अमेझॉन, फ्लिपकार्ट, ऑरगॅनिक स्टोअर्स) सारख्या ऍप किंवा सेंद्रिय दुकानांमध्ये दोनशे पन्नास ते पाचशे रुपयांमध्ये मिळते तर जैविक काळ्या तांदळाची किंमत यापेक्षा किंचित जास्त असते.



काळ्या तांदळाचे आरोग्यदायी फायदे आहेत का?



काळ्या तांदळामध्ये फायबर, लोह व तांबे या घटकांचं प्रमाण जास्त असतं. हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. काळा तांदूळ मधुमेहासाठी उपयुक्त आहे व वजन कमी करणयास मदत करतो. अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. काळा तांदूळ फायबरने भरपूर असल्यामूळे वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करत. प्रोटिन व आर्यनचा समावेश असल्याने शाकाहारी आहारात महत्वाचा घटक म्हणून काळ्या तांदळाची निवड केली जाते.

काळा तांदूळ कसा वापरावा?



काळा तांदूळ हा वेगवेगळ्या पदार्थात वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. खीर, खिचडी, इडली-डोसा, बिर्याणी किंवा थाई स्टाइल फूडमध्ये सूद्धा हा वापरता येतो. तांदूळाला शिजवण्याआधी किमान चार ते पाच तास भिजवणं आवश्यक आहे कारण काळा तांदूळ शिजवायला किमान तीस ते चाळीस मिनिटांचा कालावधी लागतो, पण चव आणि पोषण यामुळे तो निवडीसाठी योग्य ठरतो.
काळा तांदूळ कुठे मिळतो?



काळा तांदूळ हा ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘बिगबास्केट’, ‘२४ मंत्रा ऑरगॅनिक’, ‘ऑरगॅनिक इंडिया’ अशा ऑनलाईन माध्यमांवर उपलब्ध आहे. प्रत्यक्षात सेंद्रिय दुकान, कृषी प्रदर्शनं, किंवा आदिवासी जत्रांमध्ये सहज उपलब्ध होतो.



काळ्या तांदूळाचीच का निवड करावी ?


काळा तांदूळ हा पौष्टिकतेने संपूर्ण धान्य आहे जो फायबर, अँटिऑक्सिडंट्स, आणि अँथोसायनिन्स सारख्या अनेक गुणधर्माणचा समावेश करत व आरोग्यास फायदे देतो. लोह, कॅल्शियम, आणि वजन , रक्तातील साखर नियंत्रण व हृदय आरोग्यास मदत करू शकते. जर तुम्हाला तुमच्या आहारात एक पोषणमूल्यांनी समृद्ध, रासायनिक मुक्त, आणि स्वादिष्ट पर्याय हवा असेल, तर ‘काळा तांदूळ’ हा उत्तम निवड ठरतो. तो तुमच्या आरोग्याला फायदेशीर ठरेलच, शिवाय स्थानिक शेतकऱ्यांना आणि जैविक शेतीलाही चालना देईल.
- मानसी गुरव
Powered By Sangraha 9.0