शशांक हगवणे आणि सुशील हगवणेच्या अडचणीत वाढ! आणखी एक कारनामा उघड; गुन्हा दाखल

30 May 2025 13:52:57
 
Shashank & Sushil Hagavane
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले वैष्णवीचे पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शशांक आणि सुशील हगवणे यांनी खोटा पत्ता देऊन अवैधरित्या शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२२ मध्ये त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसात बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला. परंतू, पोलिसांनी त्यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी शहरात राहत असल्याचा खोटा पत्ता तयार करून शस्त्र परवाना मिळवला आणि पिस्तुल खरेदी केले. शशांकने वारजे येथे तर सुशीलने कोथरूड येथे भाड्याने राहत असल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर आता शशांक हगवणे याच्याविरोधात वारजे पोलिस ठाण्यात तर सुशील हगवणे विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव...; एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरेंची प्रतिक्रिया
 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सध्या संपूर्ण हगवणे कुटुंब पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर सुशील हगवणेचा कमरेला पिस्तूल लावून नाचतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांनी हे पिस्तूल अवैधरित्या मिळवल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0