जयंत पाटलांवर पक्षातील युवा नेते नाराज! पवारांकडे तक्रार करणार

30 May 2025 15:32:57
 
Jayant Patil
 
मुंबई : एकीकडे राज्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पक्षातील युवा नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ते शरद पवारांकडे तक्रार करणार असल्याचीही माहिती आहे.
 
पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना जयंत पाटील यांनी आपल्या निवकटवर्तीयांना अनेक महत्वाची पदे दिली. त्यामुळे पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या अनुशंगाने शरद पवारांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडल्याचीही माहिती आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार उपस्थित होते. यावेळी पक्षातील नाराज आमदारांची समजूत काढण्याबाबत चर्चा झाली.
 
हे वाचलंत का? -  ठाकरे बंधू एकत्र येण्यास राऊतांचा सर्वात मोठा विरोध! अमोल मिटकरींचा पलटवार
 
दुसरीकडे, राज्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्याही चर्चा सुरु आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाला अनेकांचा विरोध असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0