पाकिस्तानी सैन्याला भिडल्या बीएसएफच्या सात रणरागिणी! पाकडे पाठीला पाय लावून पळाले

30 May 2025 18:34:22
पाकिस्तानी सैन्याला भिडल्या बीएसएफच्या सात रणरागिणी! पाकडे पाठीला पाय लावून पळाले

नवी दिल्ली : काश्मीरच्या अखनूर भागामध्ये बीएसएफच्या सात महिला जवानांनी दोन चौक्या संरक्षित ठेवल्या. सहाय्यक कमांडन्ट नेहा भंडारी यांच्या पराक्रमामुळे बीएसएफला हे यश आले. बीएसएफतर्फे या सात जणींच्या पथकाला माघार घेण्याचा पर्यायही देण्यात आला. मात्र, या रणरागिणी हटल्या नाहीत. केवळ वर्षांचा अनुभव गाठीशी असताना त्यांनीही कामगिरी बजावली.

काश्मीरच्या अखनूर भागामध्ये दोन चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. मात्र, बीएसएफच्या सात महिलांनी जवानांनी या गोळीबाराला उडवून लावले. दोन चौक्यांवर हल्ला करण्यात आला. चौक्यांवरून माघार घेण्याचा पर्याय दिल्यानंतर ही, महिला जवानांनी माघार घेतला नाही. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांनी या हल्ल्याचे नेतृत्व केले.

पीटीआयच्या माहितीनुसार, या सात महिला सैनिकांचे कौतूक केले जात आहे, कारण ही त्यांची पहिलीच सक्रिय लढाई होती. बीएसएफच्या या सात जवानांपैकी बहुतेक जवान गेल्या दोन ते तीन वर्षांत सीमा सुरक्षा दलात सामील झाल्या आहेत. पथकाचे नेतृत्व करणारे असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी या सुमारे तीन वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये सामील झाल्या. लढाऊ भूमिकेत संघाचे नेतृत्व करणाऱ्या भंडारीया भारतातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.

भंडारी यांनी सांगितले की, "मला माझ्या सैन्यासह आंतरराष्ट्रीय सीमेवर एका चौकीवर काम करण्याचा अभिमान आहे. अखनूर-परगवाल हे पाकिस्तानी चौकीपासून सुमारे १५० मीटर अंतरावर आहे, आमच्याकडे असलेल्या सर्व शस्त्रांनी आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना त्यांच्या चौक्या सोडून पळून जाण्यास भाग पाडले."

"आम्ही सीमेवर कायम तैनात असतो, आमच्या वरिष्ठ कमांडर्सनी आम्हाला परिस्थितीची माहिती दिली आणि गोळीबार होऊ शकतो असा इशारा दिला. आम्हाला गोळीबाराला, गोळीबाराने प्रत्युत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणून, गोळीबार सुरू होताच प्रत्युत्तर देण्यात आले." चौकीवर भूमिका बजावणाऱ्या कॉन्स्टेबल शंकरी दास यांनी पीटीआयला सांगितले.

थेट गोळीबार करणाऱ्या सहा महिलांपैकी चार महिला २०२३ मध्येच दलात सामील झाल्या, मनजीत कौर आणि मलकीत कौर यांनी दोन महत्त्वाच्या पदांवर काम केले. पश्चिम बंगालमधील स्वप्ना रथ आणि शंपा बसक, झारखंडमधील सुमी क्षेस आणि ओडिशातील ज्योती बानियान यांच्यासाठी, हे अभियान एक शक्तिशाली चाचणी होती.


Powered By Sangraha 9.0