पाकच्या गुप्तचर विभागाला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला ठाण्यातून अटक; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई!

30 May 2025 12:34:03
 
ATS arrests Thane resident Ravindra Verma for sharing confidential information to Pakistani operative
 
 
मुंबई : (ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
 
२५ वर्षीय रविंद्र वर्मा हा ठाण्यातला रहिवासी असून मुंबईत एका कंपनीत कामाला होता. सोशल मीडियावर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे त्याला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तो नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त त्याचे मुंबई नौदल गोदीत जाणे-येणे असायचे. त्यामुळे त्याच्याकडे गोदीची महत्त्वाची माहिती व नकाशे होते जे त्याने पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
 
याप्रकरणी आतापर्यंत तिघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणी अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0