पुण्यात पाणी कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद!

03 May 2025 14:00:07

पुण्यात पाणी कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद!

पुणे
: पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील कात्रज, धायरी, आंबेगाव आणि सिंहगड काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात सोमवार दि. ५ मे पासून करण्यात येणार आहे.

पाणी कपातीमुळे नागरिकांना अडचणी येऊ शकतात, पण प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, ही कपात आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, कारण पाण्याची बचत करणे अतिशय महत्त्वाचे आहे.


पुणे शहरात पाण्याची एकूण मागणी २५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणाने वाढली आहे, त्यामुळे ही पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करावी आणि पाण्याचा योग्य प्रकारे वापर करावा असे आवाहन पुणे महानगर पालिकेने केले.

पावसाळा चालू होईपर्यंत पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाणी जपून वापरावे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी, प्रशासनाने लोकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.


Powered By Sangraha 9.0